कपडे दान अभियान
वस्त्रदान हेच श्रेष्ठ दान
हिवाळ्यात किंवा कडक उन्हात अनेक गरीब आणि गरजू कुटुंबियांना वस्त्रांअभावी अत्यंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. तुमच्या घरातील न वापरलेले पण चांगल्या अवस्थेत असलेले कपडे दान करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणा.
कोणते कपडे हवे आहेत?
- सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांचे कपडे
- लहान मुलांचे कपडे (अत्यंत गरज)
- चादरी, ब्लँकेट्स आणि उबदार कपडे
ज्ञान दान (पुस्तक दान)
ज्ञानाचा दिवा घराघरात लावूया
अनेक हुशार पण गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे स्पर्धा परीक्षांची व शैक्षणिक पुस्तके विकत घेणे शक्य होत नाही. तुमची जुनी किंवा न वापरलेली पुस्तके गरजू विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यासाठी वरदान ठरू शकतात.
कोणती पुस्तके हवी आहेत?
- शालेय व महाविद्यालयीन पाठ्यपुस्तके
- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शिका (MPSC, UPSC इ.)
- कथा, कादंबऱ्या आणि प्रेरणादायी पुस्तके
दान देण्याची प्रक्रिया कशी चालते?
नोंदणी करा
खालील फॉर्ममध्ये तुमचे नाव, पत्ता आणि तुम्ही काय दान करू इच्छिता याची नोंद करा.
आमचा संपर्क
आमचे स्वयंसेवक तुमच्याशी संपर्क साधून कपडे किंवा पुस्तके गोळा करण्याची वेळ ठरवतील.
योग्य हाती वितरण
गोळा केलेले साहित्य धुऊन व नीट वर्गीकरण करून थेट गरजू वस्त्यांवर आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाईल.
थेट संपर्क साधा
तुम्हाला या मोहिमेत स्वतःहून साहित्य आणून द्यायचे असल्यास किंवा काही अडचण असल्यास आमच्या हेल्पलाईनवर संपर्क साधू शकता.
मोबाईल नंबर
+91 7517415939ईमेल आयडी
info@shrimanyogi.org