“व्यसनातून मुक्ती आणि आत्मविश्वासातून प्रगती”
आज अनेक तरुण विविध व्यसनांच्या जाळ्यात फसून स्वतःचे आणि कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत. आमचे अभियान व्यसनात अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना एक निरोगी जीवन जगण्याची नवी उमेद देते.
तंबाखू, दारू, अमली पदार्थ आणि डिजिटल व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी टप्प्याटप्प्याने वैद्यकीय व समुपदेशन मदत.
व्यसन सोडल्यानंतर पुन्हा व्यसन जडू नये म्हणून निरंतर मदत, काळजी आणि मानसिक आधार देणे.
शाळा, महाविद्यालये आणि ग्रामीण भागांमध्ये व्यसनांचे दुष्परिणाम दाखवण्यासाठी पथनाट्य, शिबिरे व व्याख्याने आयोजित करणे.