पुस्तके दान का करावीत?
आजही आपल्या समाजात असे अनेक गुणवंत आणि कष्टाळू विद्यार्थी आहेत ज्यांना केवळ आर्थिक टंचाईमुळे हवी असलेली अभ्यासाची पुस्तके खरेदी करता येत नाहीत. परीक्षेची तयारी करताना लागणारे महागडे संदर्भ ग्रंथ किंवा स्पर्धा परीक्षांची पुस्तके न मिळाल्यामुळे कित्येक स्वप्ने अपूर्ण राहतात.
तुमच्या घरातील कपाटात पडून राहिलेली पुस्तके या गरजू विद्यार्थ्यांसाठी यशाचा मार्ग बनू शकतात. आपण दिलेले छोटेसे योगदान एका विद्यार्थ्याला आत्मनिर्भर बनवू शकते.
आम्हाला कोणत्या पुस्तकांची गरज आहे?
-
स्पर्धा परीक्षा पुस्तके MPSC, UPSC, बँकिंग, रेल्वे, पोलीस भरती इत्यादी.
-
शालेय व महाविद्यालयीन पुस्तके इयत्ता १ ली ते १२ वी आणि पदवी/अभियांत्रिकीची पुस्तके.
-
कथा, कादंबऱ्या व वैचारिक साहित्य विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व व वाचन कौशल्य वाढवण्यासाठी उपयुक्त पुस्तके.
पुस्तक संकलन व वितरण प्रक्रिया
१. नोंदणी व माहिती
खालील फॉर्मद्वारे तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या पुस्तकांची माहिती आम्हाला कळवा.
२. पुस्तक संकलन
आमचे स्वयंसेवक तुमच्या दिलेल्या पत्त्यावरून पुस्तके गोळा (Collect) करतील.
३. सुयोग्य वितरण
पुस्तकांचे योग्य वर्गीकरण करून ती गरजू व होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत मोफत पोहोचवली जातील.
थेट संपर्क साधा
तुम्हाला पुस्तके स्वतः जमा करायची असल्यास किंवा काही शंका असल्यास आमच्या टीमशी संपर्क साधू शकता.
मोबाईल नंबर
+91 7517415939ईमेल आयडी
info@shrimanyogi.org